मित्रांनो लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाची आणि आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा सहावा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांत रक्कम जमा होणार
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, या योजनेचे पैसे दोन दिवसांत खात्यावर जमा होतील. गुरुवारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली.
या घोषणेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की, या संदर्भात कोणतेही नवे परिपत्रक जारी केलेले नाही.
योजनेचा सहावा हप्ता लवकरच
सरकारच्या वतीने आश्वासन देण्यात आले आहे की, योजनेचा सहावा हप्ता पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर मिळवून दिला जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता खात्रीपूर्वक वाट पाहावी.
योजनेतील अपडेट्ससाठी आणि खात्यात पैसे जमा झाले आहेत का, याची माहिती वेळोवेळी तपासत राहणे गरजेचे आहे.